मला Logistics Supplier / Partner शोधून हवाय !

मला Logistics Supplier / Partner शोधून हवाय !

2,500

👉🏻 आमचे एक ऑनलाईन किराणा स्टोअर आहे. त्यासाठी आम्हाला संपूर्ण राज्यभरात मोठी ऑर्डर आल्यास डिलिव्हरी करता यायला हवी. जसे की किराणा असल्यामुळे वीस ते पन्नास किलो मटेरियल एका वेळी बॉक्समध्ये किंवा गोणीमध्ये जाईल.

हे महाराष्ट्रातलं कोणत्याही भागातून ऑर्डर आल्यावर ती द्यायचे आहे.

यासाठी आम्हाला एक लॉजिस्टिक पार्टनर हवा आहे जो आमच्या तपोवन रोड येथील गोडाऊन वरून माल पिकअप करेल आणि जसं आपण कुरिअर कंपनीचा ट्रेकिंग नंबर देतो तसं ट्रेकिंग करून पुढे जिथे राज्यातून कोणत्याही भागातून कस्टमर कडून ऑर्डर आलेली असेल तेथे डिलिव्हर करेल.

Overview

  • Terms And Conditions: हे काम करण्यास इच्छुक असाल तर या Gig Work साठी पहिले Flekxiwork च्या वेबसाईट वरून पाहिले Enroll करा..

    सर्व माहिती नीट समजून घ्या आणि मग कामाला सुरुवात करा.

    एकदा तुम्ही enroll केले की पुढील पंधरा दिवसात Task तास तुम्हाला पूर्ण करावा लागेल..

    जर पंधरा दिवसांमध्ये तुमचा कोणताही रिप्लाय आला नाही किंवा टास्क पूर्ण झाला नाही तर हा टास्क क्लोज होऊन जाईल आणि मग त्याचा कोणताही मोबदला तुम्हाला मिळणार नाही..

    Flekxiwork या कामासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ❌ कॅश स्वरूपात पैसे देत नाही..❌ आपण काम केल्यानंतर त्या बदल्यात आपल्याला वॉलेट बॅलन्स मिळतो ज्या माध्यमातून तुम्ही Yaadi store App मधून खरेदी करू शकता..

    यादीचे ॲप google play store वर उपलब्ध आहे.

    तुम्ही जेव्हा कोणताही टास्क हातात घ्याल तेव्हा तो एकाच वेळी इतरांना सुद्धा assign होतो जर असे झाल्यास कोणत्याही व्यक्तीकडून टास्क पूर्ण झाला तर हा टास्क क्लोज होईल.

    त्यामुळे जो हाजीर तो वजीर जो लवकरात लवकर हे काम पूर्ण करून देईल त्यालाच मोबदला मिळेल .

    त्यामुळे तुम्ही कोणताही टास्क हातात घेतल्यास तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढा हा टास्क पूर्ण करून द्यायला हवा जरी Task पूर्ण करण्यासाठी काही मुदत दिली असेल तरी रोज सकाळी पहिले हा टास्क ओपन आहे ना याची खात्री करून मग कामाला सुरुवात करायला हवी अन्यथा तुम्ही एखादे काम पूर्ण कराल आणि मग जेव्हा वेबसाईटवर जाऊन बघाल तेव्हा तो टास्क क्लोज झालेला असेल तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळू शकणार नाही.

    या कामासाठी कोणताही इतर मोबदला जसे की पेट्रोल अलाउन्स किंवा काही स्वरूपात ऍडव्हान्स किंवा कोणताही तुमचा अपघात किंवा काम करताना दुर्घटना घडल्यास त्याचा वेगळा मोबदला तुम्हाला मिळणार नाही

    सध्या ही स्कीम फक्त अहिल्यानगर शहर साठी लागू..
  • Gig worker ला हे काम केल्याचा काय फायदा: पहिले गुगल किंवा just dial सारख्या प्लॅटफॉर्म वरून अशा सर्व्हिस प्रोवायडर पार्टनर ची माहिती शोधून घ्यावी
    नंतर त्यांच्याशी फोन वर बोलून विषय समजून सांगावा
    मग समक्ष भेट घ्यावी ...
  • हे Gigwork कोण करू शकते?: गृहिणी ,विद्यार्थी ,नोकरदार व्यवसायिक , दुकानदार, रिटायर्ड व्यक्ती अगदी कुणीही
  • यासाठी काही शुल्क (Fees)आहे का?: NO. काहीही नाही .सर्व प्रक्रिया मोफत आहे..
  • हे Gig work करण्यासाठी काय लागेल?: अँड्रॉइड फोन, इंटरनेट , दुचाकी आणि जनसंपर्क आवश्यक
  • Gig worker ला नेमके काय काम आहे?: नगरमध्ये अशा कार्गो कुरिअर करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत अशा कंपन्यांना शोधून प्रत्यक्ष तुम्हाला व्हिजिट करून त्यांना ही कन्सेप्ट सांगून ते जर हे करू शकत असेल तर त्यांची आणि आमची एक मीटिंग करून द्यायला हवी.
    त्यांच्या व आमच्या सर्व प्रोफेशनल Terms मॅच व्हायला हव्यात..

    त्या कंपनीचा व आमचा सकारात्मक करार झाल्यास तुम्हाला तुमचा वॉलेट बॅलन्स मिळेल.

    वॉलेट बॅलन्स 2500 हजार रुपये मिळेल..
  • आम्ही हे काम बाहेर अशा प्रकारे का देत आहोत आम्ही स्वतः का शोधत नाही?: आत्ता आमच्याकडे भरपूर सारी बाकीची काम सुरू आहेत मग सगळी कामं स्वतः करण्यापेक्षा आणि ह्या कामासाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमण्यापेक्षा हे एक वेळेचे काम आहे त्यामुळे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा Gig work च्या संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

    या आणि यासारखे 50 पेक्षा अधिक टास्क आणि ऍक्टिव्हिटी आपल्या ॲपवर / वेबसाईट वर उपलब्ध आहेत..
  • याविषयी मला अधिक ची माहिती कुठे मिळेल?: तुम्ही आमच्या कस्टमर केअर 7272 997 997 नंबर वर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधू शकता.
  • हे काम करताना महत्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी: कोणतीही रेगुलर कुरिअर कंपनी हे काम करू शकत नाही यासाठी कार्गो कुरिअर लागते.

    साधारण कार्गो कुरिअर करणाऱ्या कंपनीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात डिलिव्हरी करण्याची क्षमता असावी

    त्यांचा प्रति किलो रेट दोन ते पाच रुपये असावा

    किराणा मटेरियल सप्लाय करायचे आहे त्यामुळे त्यांना याबाबत आवर्जून आगोदर माहिती द्यावी

    नगर मधून भरपूर सारे इंडस्ट्रियल मटेरियल कुरिअर केले जाते आणि नगरमध्ये येते त्यामुळे अशा लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करायला हवी

    किराणा आयटॅम आहे त्यामुळे आम्ही करत नाही असा सुरुवातीला नकार येऊ शकेल पण यामध्ये फुटेल किंवा वाया जाईल असे काही नसेल आणि तसे योग्य पॅकिंग करून दिले जाईल असे तुम्हाला त्यांना समजावून सांगावे लागेल.

    त्यांची आणि आमची प्रत्यक्ष मीटिंग व्हायला हवी आणि नंतर करार व्हायला हवा म्हणजे हा टास्क पूर्ण झाला असे गृहीत धरले जाईल.
  • Rewards: 2500